TITWALA GANPATI VISARJAN CLASH saam tv
मुंबई/पुणे

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

Titwala Ganpati Procession Turns Chaotic: टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की आणि मारहाणीप्रकरणी दोन्ही गटांतील ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

गणपती विसर्जन मिरवणूक पुढे-मागे घेण्यावरून टिटवाळ्यात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर कार्यकर्त्यांमधील बाचाबाची आणि झटापटीत झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि ठाकरे गटाचे सुरेश भोईर यांच्या घरगुती गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असताना हा वाद झाल्याची माहिती आहे. मिरवणूक पुढे कोणाची आणि मागे कोणाची, यावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी शक्तिवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर, प्रदीप भोईर, सुरेश भोईर यांच्यासह दोन्ही गटांतील सुमारे ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम श्रीकृष्णा हॉस्पिटल रोड, एमएनएस चौक आणि स्टेशन रोड परिसरात हा प्रकार घडला. गणपती विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक पुढे-मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोन्ही गटांतील व्यक्तींमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या वाद्यवृंद वाजविण्याच्या नियमांचे उल्लंघन तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही पोलिस नोंदीत नमूद आहे.

शक्तिवान भोईर आणि उपेक्षा भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता अडवण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९४, १२६, २२३ आणि ३३(१)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई योगेश भोलानाथ निर्मळ यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या या वादामुळे टिटवाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची नेमकी पार्श्वभूमी, सहभागी व्यक्तींची भूमिका आणि नियमभंगाच्या बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT