Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Buldhana Political News : बुलढाण्यात भाजप नगरसेवक आकाश दळवींवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न. कारंजा चौकातील घटनेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Buldhana BJP Aakash Dalvi Attack News
Buldhana BJP Aakash Dalvi Attack News Saam tv
Published On
Summary
  • बुलढाण्यात धक्कादायक घटना

  • भाजप नगरसेवक आकाश दळवींवर तलवारीने हल्ला

  • आकाश दळवींनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

  • ३ जणांवर गुन्हा दाखल

बुलढाणा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बुलढाणा नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आहे. शहरातील गजबजलेल्या कारंजा चौक परिसरात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणी आकाश दळवी यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

तक्रारीनुसार, आकाश दळवी यांना काही व्यक्तींनी शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर धमकी देत शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तलवारीच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारदाराकडून नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी निखिल शर्मा, वंश शर्मा आणि आर्यन शर्मा यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

Buldhana BJP Aakash Dalvi Attack News
Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

राजकीय वादाची किनार

दरम्यान, या घटनेला राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा बुलढाणा शहरात सुरू झाली आहे. संबंधित व्यक्तींमध्ये यापूर्वी काही वाद किंवा राजकीय मतभेद होते का, तसेच त्यातूनच हा प्रकार घडला का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेमागील राजकीय कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

Buldhana BJP Aakash Dalvi Attack News
Gold Rate Today : गणेशोत्सवापूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; १ तोळ सोने इतक्या रुपयांनी महागलं; जाणून घ्या आजचे ताजे दर

पोलीस तपास सुरु

कारंजा चौकासारख्या वर्दळीच्या भागात शस्त्राचा वापर करण्याचा कथित प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून घटनेशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून, उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर बुलढाणा शहरातील राजकीय वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या तपासातून हल्ल्याचा नेमका उद्देश आणि घटनेमागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com