Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

special trains for Ganesh festival 2025 : मध्य रेल्वेने यंदा गणपतीसाठी ४४ अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या आता २९६ झाली आहे. ही गाडी २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२५ दरम्यान चालवण्यात येणार आहे.

Namdeo Kumbhar

  • गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने आणखी ४४ विशेष गाड्यांची घोषणा केली.

  • यामुळे एकूण २९६ गणपती विशेष गाड्या धावणार आहेत.

  • दिवा–चिपळूण–दिवा मेमू सेवेला २ अतिरिक्त फेऱ्यांची वाढ.

  • प्रवाशांना अधिक सोयीसाठी विस्तृत वेळापत्रक जाहीर.

Ganpati special trains 2025 full list : कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेकडून खुशखबर देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून श्रीगणेश उत्सवानिमित्त ४४ अतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता २९६ वर पोहचली आहे. तर दिवा–चिपळूण–दिवा मेमू (प्रति दिवस अनारक्षित विशेष ट्रेन) या सेवांना आणखी २ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने आधीच जाहीर केलेल्या २५० गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त, मध्य रेल्वे ४४ गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनचा विस्तार आणखी २ सेवा वाढवून करणार आहे. येत्या गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या फायद्यासाठी आतापर्यंत घोषित एकूण २९६ गणपती विशेष ट्रेन चालणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ८ सेवा)

01131 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)

01132 द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)

कोण कोणत्या स्टेशनवर थांबणार?

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

दिवा -खेड -दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (३६ सेवा)

01133 मेमू विशेष ट्रेन २२.८.२०२५ ते ८.९.२०२५ पर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १३.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी २०.०० वाजता खेड येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)

01134 मेमू विशेष ट्रेन २३.८.२०२५ ते ९.९.२०२५ पर्यंत खेड येथून दररोज सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.०० वाजता दिवा येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)

कोण कोणत्या स्टेशनवर थांबणार?

निळजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.

दिवा– चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार

ट्रेन क्रमांक 01155/01156 दिवा–चिपळूण–दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या २ अतिरिक्त फेऱ्यांनी विस्तार करण्यात आलेला आहे. 01155 दिवा–चिपळूण विशेषची १ फेरी आणि 01156 चिपळूण–दिवा विशेषची १ फेरी वाढवण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या ३८ अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता एकूण ४० अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT