Mahesh Gaikwad Saam Digital
मुंबई/पुणे

Mahesh Gaikwad: महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार नाही; घर, ऑफिसबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

Mahesh Gaikwad News: महेश गायकवाड यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यांच्यावर आणखी २ ते ३ दिवस उपचार सुरू राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस अलर्ट मोडवर आहे.

Sandeep Gawade

Ganpat Gaikwad Police Station Firing Case

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला गोळीबार केला होता. सत्ताधारी गटाच्या आमदाराने पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान महेश गायकवाड यांना आद हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यांच्यावर आतड्यांवर चालताना ताण पडत असल्यामुळे त्यांच्यवर आणखी २ ते ३ दिवस उपचार सुरू राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे कल्याण पोलीस अलर्ट मोडवर असून महेश गायकवाड यांचे घर आणि ऑफिस बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात जखमी झालेले शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. याच पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून कल्याण भागात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी जमिनीचा वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता . या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते तर दुसरीकडे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या दीर्घायुश्यासाठी समर्थकांकडून होम हवन, मंत्र जप केले जात होते. तब्बल तेरा दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डीचार्ज मिळणार आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आलेत यामधील टायगर इज बॅक, भावी आमदार आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, आज महेश गायकवाड हे पत्रकार परिषदही घेणार आहेत, या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT