Gangster Prasad Pujari  Saam Digital
मुंबई/पुणे

Gangster Prasad Pujari : अखेर कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीच्या चीनमध्ये आवळल्या मुसक्या; २००५ हाँगकाँगला गेला होता पळून

Sandeep Gawade

Gangster Prasad Pujari

मोस्ट वॉन्टेड आणि छोटा राजनसाठी काम करणाऱ्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आज सकाळ ८ वाजता त्याला मुंबईत आणण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून तो फरार होता. त्यामुळे पोलिसांची पथक देशविदेशात त्याच्या मागावर होती. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे, अशी माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसाद पुजारी हा मुळचा कर्नाटकचा असून वाशीमध्ये वास्तव्याला होता. तो पिल्लाई गँगमध्ये काम करत होता नंतर तो छोटा राजनसाठी काम करत होता. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर ८ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात खून, अक्स्टर्शन फायरिंग, ठाणे मुंबई, नवी मुंबई येथे अनेक खंडणीचा मसावेश आहे. त्याच्यावर 307,452 आणि मोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद आहेत. 2002 मध्ये पाहिला गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळी त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो 2005 मध्ये तो बाहेरगावी हाँगकाँग पळून गेला होता. २०२४ मध्ये त्याच्यावर विक्रोळीत शेवटचा गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये त्यांने एका राजकीय नेत्याला आणि उद्योगपतीला धमकी दिली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विक्रोळी परिसरात राहणाऱ्या शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यावर 19 डिसेंबर 2019 रोजी गोळबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात प्रसाद पुजारीचे नाव पुढे आले होते. गोळीबारात जाधव यांना गोळी चाटुन गेली होती. मार्च 2008 मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते. तेव्हा पासुन प्रसाद पुजारी चिन मध्ये हाता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT