Sharad Pawar News: शेतकरी हवालदिल; पण या सरकारला चिंता नाही... इंदापुरच्या सभेतून शरद पवार यांचे टीकास्त्र

Mahavikas Aaghadi Sabha Indapur: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभांचा धडाका सध्या बारामती मतदार संघात सुरू आहे. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडत आहे.
Sharad Pawar On Modi Government
Sharad Pawar On Modi GovernmentSaam Tv

Sharad Pawar Speech:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभांचा धडाका सध्या बारामती मतदार संघात सुरू आहे. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले शरद पवार?

"आज एक वेगळी स्थिती देशात आहे. देशाचा कारभार कोणाच्या हाती असावा प्रश्न आपल्या समोर आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, या सरकारने अनेक आश्वासन आपल्याला दिले. मात्र सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही," असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

तसेच "कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने संविधान बदलण्यासाठी मतदान द्या, असे विधान केले. भाजपच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकांसाठी सत्ता वापरणं हे लोकशाहीमध्ये गैर नाही, पण सत्तेचा वापर करून संविधानावर हल्ला होण्याची शक्यता असली, तर त्यासाठी सामान्य माणसाने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे," असे आवाहनही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar On Modi Government
Shirur Lok Sabha: अजित पवारांनी डाव टाकला, अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी मोठी खेळी; शिरुरचे समीकरण बदलणार?

"संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. केजरीवाल यांनी आदर्श काम करून देखील त्यांना तुरुंगात टाकले. केजरीवाल यांच्या आयुष्यातील 78 जागा जिंकून आणल्या फक्त दोनच जागा भाजपला मिळाल्या. 98% निकाल जनतेने केजरीवाल यांच्या बाजूने दिला असा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे," असेही शरद पवार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Sharad Pawar On Modi Government
Breaking News: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार पेटली; चारजण होरपळले तर गाडीचा जळून कोळसा, यवतमाळमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com