Nilesh Ghaywal  Saam tv
मुंबई/पुणे

Nilesh Ghaywal : कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात ट्विस्ट; मामाचा आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

Nilesh Ghaywal Latest News : कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालाय. घायवळला तुरुंगातून रोहित पवारांनी बाहेर काढल्याचा आरोप घायवळच्या मामाने केला आहे.

Vishal Gangurde

गुंड निलेश घायवळ याच्या मामाने आमदार रोहित पवारांवर केला गंभीर आरोप

गुंड घायवळ तुरुंगातून बाहेर काढण्यात रोहित पवारांचा हात, मामा गायकवाड यांचा आरोप

मामा जानकीराम गायकवड यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

अक्षय बडवे, साम टीव्ही

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात त्याच्या मामाने उडी मारली आहे. या प्रकरणात त्याचा मामा जानकीराम गायकवाड यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. निलेश घायवळ याला तुरुंगातून बाहेर काढण्यात रोहित पवारांचा हात असल्याचा आरोप मामा जानकीराम अण्णा गायकवाड यांनी केला आहे.

निलेश घायवळला तुरुंगाबाहेर रोहित पवार यांनी काढल्याचा आरोप त्याच्या मामाने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'निलेश घायवळ हा नऊ तारखेला परदेशात गेला. त्यानंतर 17 तारखेला गोळीबार झाला आणि 24 तारखेला एफआयआर झाली. त्याने दहा फ्लॅट घेतले तर एवढ्या दिवसांत तक्रार का नाही दिली? असा सवाल देखील मामा गायकवाड यांनी या प्रकरणात केला.

सभापती राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माणसाचा रोहित पवार यांच्या सोबत असलेला फोटो निलेश घायवळ याच्या मामाने दाखवला. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी निवडणूक झाली. तेव्हा रोहित पवार यांनी एका व्यक्तीला सांगून निलेश गायवळचा मामा कुठे राहतो असे विचारले. त्यानंतर मला भेटायला बोलावलं, असं मामाने सांगितलं.

रोहित पवार यांनी मला निलेश कुठे आहे, असा प्रश्न विचारल्यावर मी त्यांना जेलमध्ये असल्याचे सांगितले. एका विशेष तारखेला निलेश घायवळ बाहेर येईल, असं रोहित पवार यांनी मला सांगितलं. त्याच दिवशी निलेश घायवळ तुरुंगाच्या बाहेर आला, जानकीराम गायकवाड यांनी सांगितलं.

निलेश घायवळचा मामा जानकीराम गायकवाड यांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात गायकवाड मामा यांच्या आरोपांना आमदार रोहित पवार यांचं प्रत्युत्तर महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT