Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Dombivli Latest News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती ठरली आहे. स्वराज्य ग्रुपचा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Dombivli
Dombivli Saam tv
Published On
Summary

डोंबिवलीत स्वराज्य ग्रुपने साकारली खांदेरी-उंदेरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नाव असलेल्या किल्ल्यांचा साजेसा गौरव

किल्ल्याच्या सजावटीत पारंपरिक दिवे, झेंडे, मावळ्यांचा समावेश

दुसरीकडे, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसाने केली नागरिकांची दाणादाण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

संस्कृती आणि परंपरांनी नटलेल्या डोंबिवली शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या निमित्ताने किल्ल्यांची परंपरा जोपासली जात आहे. डोंबिवली पूर्व येथील श्री विवेकानंद सहकारी गृह निर्माण संस्थेत तयार करण्यात आलेला सुंदर किल्ला विशेष आकर्षण ठरतोय. ७ x १८ फूट लांबीच्या खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची ही सुंदर प्रतिकृती आहे.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान असलेला हा किल्ला आहे. नुकताच युनेस्कोने खांदेरी-उंदेरी किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश केल्याने या प्रतिकृतीचे महत्त्व अधिक वाढले आहे. स्वराज्य ग्रुपने या पार्श्वभूमीवर हा किल्ला उभारून इतिहासाचा आणि देशाच्या अभिमानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवलाय.

किल्ल्याची रचना अत्यंत बारकाईने करण्यात आली आहे. त्यात तटबंदी, बुरूज, तोफखाना, आणि सागरी पार्श्वभूमी यांचे अचूक दर्शन घडतं. या किल्ल्याच्या सजावटीत पारंपरिक दिवे, झेंडे, तसेच मराठा सैनिकांच्या प्रतिकृतींनी भर घातली आहे.

Dombivli
Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

या उपक्रमाबद्दल बोलताना स्वराज्य ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी आम्ही एक ऐतिहासिक किल्ला साकारतोय. यंदा खांदेरी-उंदेरी किल्ला निवडण्यामागे उद्देश होता. सागरी वारशाचा गौरव आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याची आठवण करून दिवाळीच्या सणात परंपरेचा आणि देशभक्तीचा संगम घडवणारा हा उपक्रम डोंबिवलीकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Dombivli
Taj Hotel viral video : पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल

​कल्याण-डोंबिवलीत पावसाचा दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची दमदार हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण, पण सायंकाळ होताच पावसाच्या जोर वाढल्याने नागरिकांची धावपळ झाली. कालच्या पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील गणेश नगरमध्ये झाड पडून तीन घरांचे नुकसान आणि दोन नागरिक जखमी झाले होते. रात्री १० नंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com