Congress Saam TV
मुंबई/पुणे

'गांधी परिवार काँग्रेसचं ह्रदय, त्यांच्याबद्धल अपप्रचार करणाऱ्यांना किंमत नाही'

'आम्ही गांधी घराण्याच्या पाठिशी आहोत, 2024 मध्ये काँग्रेस चे सरकार आणायचे यासाठीच आजची बैठक'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमधील गांधी भवनामध्ये काँग्रेसची एक बैठक आयोजित केली होती. ही बैठक संघटनात्मक आणि पक्ष बांधणीसाठी होती. या बैठकीदरम्यान पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, आता झालेल्या निवडणुकीत आम्ही नेकमे कुठे कमी पडलो याविषयी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, तसंच आम्ही गांधी घराण्याच्या पाठिशी आहोत, 2024 मध्ये काँग्रेस चे सरकार आणायचे यासाठीच आजची बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाबाबत (Assembly Speaker) त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माननीय हाय कोर्टाने दिलेले निर्देश सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे. मात्र हे प्रकरण कोर्टात अजून आले नाही. राजकारण न करता भाजपा (BJP) जे सांगत आहे ते न ऐकता राज्यपाल आम्हाला सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास असल्याचं ते म्हणाले.

ऑन गांधी परिवार याना अध्यक्षपद देण्याबाबत गांधी परिवार हा काँग्रेसचं ह्रदय आहे, माथेफिरू कोणी असे बोलत असेल तर ते योग्य नाही. राहुल प्रियांका आणि सोनिया यांच्या बद्धल कोणी अपप्रचार करत असेल तर कार्यकर्त्यांमध्ये त्याला किंमत राहणार नाही. 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files)सारखा गोंधरा हत्याकांड आणि पुलवामा सारख्या विषयावर सत्य परिस्थिती दाखवा, यांच्यावर ही सिनेमा व्हायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे असही नाना पटोले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT