रश्मी पुराणिक -
मुंबई : आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पावर उत्तर देत होते. यावेळी फडणवीसांनी राज्य सरकार निधी देताना भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता त्यावरती उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही भेदभाव करुन चालत नाही.
आज अर्थसंकल्पाबाबत बोलत असताना अजित पवारांनी अनेक मुद्यांवरती भाष्य केलं. कोरोना (Corona) बाबत बोलताना ते म्हणाले, कोरोनाला हलक्यात घेऊ नका चीननध्ये १५ शहरामध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे कोरोनाला गंभीरतेने घेतलं पाहिजे चौथी लाट येऊ नये हीच इच्छा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार महापालिका ते नगरपालिकांनी आपापली कामं केली, लसीकरण केलं. मात्र, अजूनही काही जण लसीकरण प्रतिसाद देत नाहीत, ग्रामीण भागात लसीकरण (Vaccination) गंभीरतेने घेत नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना समजावने आपली जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, अर्थसंकल्प देत असताना विरोधक टीका करत होते अर्थसंकल्प फसवा आहे, मात्र राजकरण करायच नाही, मविआने सरकराने सादर केलेल्या अर्थसंकल्पामून भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच या अर्थसंकल्पामध्ये आपण पंचसुत्री सादर केली यामध्ये एकच भावना आहे ती म्हणजे, राज्याला पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करायच, महसूल तुट कशी कमी करता येईल, सर्वसामान्यावर जास्त कर लागणार नाही आणि राज्याचा गाडी व्यवस्थित कसा चालेल याचा प्रयत्न केला असल्याच त्यांनी सांगितलं.
तसंच आम्ही आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न करत आहोत, मात्र देवेंद्र फडणवीस मुद्दा काढला मला आश्चर्य वाटलं, त्यांनी सांगितल 'काँग्रेसला इतके, राष्ट्रवादीला इतके पैसे दिले जातात निधी वाटपात भेदभाव केला जातो.' मात्र एखादा विभाग कुणाकडे असेल तर ते त्यांचे वैयक्तिक पैसे नसतात असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या टीकेलाही उत्तर दिलं.
तसंच जे काही बजेट तयार करतो त्यावर मुख्यमंत्री सही करतात भेदभाव करून चालत नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवस चालणार नाही. महसूल खातं टॅक्स देत त्याच्यावर खर्च होत नाही. काही खाती उत्पन्न देतात, काही खाती खर्च करतात लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्र बसला. मुबई पुणे नाशिक नागपूर सेवा आणि व्यवसाय सगळ बंद आपल्याला जो टॅक्स मिळत होता तो कमी झाला त्यामुळे राज्याच्या महसुलाला फटका बसल्याचंही त्यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.