चंद्रकांतदादांना साडेतीन तासांत कोल्हापूरला पाठवण्यासाठी गडकरींनी शोधली नवी मेट्रो? Saam Tv
मुंबई/पुणे

चंद्रकांतदादांना साडेतीन तासांत कोल्हापूरला पाठवण्यासाठी गडकरींनी शोधली नवी मेट्रो?

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम थिएटर पर्यंतच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम थिएटर पर्यंतच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी गडकरी यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. आपण एक नवी मेट्रो शोधली असल्याचं सांगताना गडकरींनी चंद्रकांतदादांना उद्देशून तुम्हाला साडेतीन तासांत कोल्हापूरला जाता येईल, असं म्हटल्यानं उपस्थितांमध्ये हास्याचं कारंजं उडालं.

हे देखील पहा-

ते यावेळी म्हणाले, मी एक नवी मेट्रो शोधली आहे. त्याची किंमत एक कोटी रुपये पर किलोमीटर आहे, ही 8 डब्ब्यांची ही मेट्रो आहे. तर बिझनेस क्लास आहे. या मेट्रोत एअर होस्टेस अश्या सर्व काही सुविधा असणार आहे. या मेट्रोचा वेग ताशी 120 किमीने असेल त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना गडकरी म्हणाले, म्हणजे आता चंद्रकांत दादा तुम्हांला ३:३० तासांत कोल्हापुरला जाता येईल.

तसेच या कामादरम्यान बेरोजगार लोकांना नोकरी देणार असे गडकरी म्हणाले. त्यासाठी काही पैसे न घेता मी स्वतः कन्सल्टंट बनण्यासाठी तयार आहे. यामध्ये इंटनेट, वायफाय, टेलिव्हिजन अश्या सुविधा मोफत मिळणार. तसच याचे तिकिट एसटीच्या तिकीट एवढंच असेल. त्याच्या वेग तासाला 140 इतका आहे. चंद्रकांत दादा पाटील यांना या ट्रेनने पावणे तीन ते तीन तासात कोल्हापूरला जाता येईल आणि ती ट्रेन स्टेशलाच थांबेल असं गडकरी म्हणाले.

पुढे ते बोलत होते, मला आज दोन गोष्टींचा आनंद झाला आहे. पुण्याच्या मेट्रोचं काम सुरु झालं नाही, पण नागपूरचं मात्र पुढे गेलं आहे. तेव्हा पुण्यात माझ्यावर, फडणवीस यांच्यावर टीका झाली. तेव्हा मी पुण्यात या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलेलो. पेच सोडवण्यासाठी चर्चा करायची होती. त्यावेळी मी पवारसाहेब यांच्या सोबत होते. पुण्यात मेट्रो अंडरग्राउंड की वरून करायची असा प्रश्न सर्वांसमोर होता. तेव्हा आम्ही म्हणालो, आपण जेवढं अंडरग्राउंड करू तेवढा खर्च वाढेल. खर्च वाढला की त्यामुळे तिकिटही वाढेल. तेव्हा मार्ग निघाला आणि काम वेगाने सुरु झालं. आज त्याचं समाधान वाटलं अश्या भावना गडकरी यांनी बोलत असताना व्यक्त केल्या.

Edited by-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT