Ganpati Festival 2023, pune metro saam tv
मुंबई/पुणे

Ganesh Festival 2023 : पुणेकरांनाे ! लाडक्या 'बाप्पा' ला मेट्रोतून घरी नेता येणार, वाचा नियमावली

Ganeshotsav 2023 : भाविकांना काही मदत हवी असल्यास त्यांनी 18002705501 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune Metro Guideliness For Carrying Ganpati : पुण्यातील गर्दी व वाहतूक कोंडी लक्षात घेता यंदा पुणेकरांना गणरायाचे आगमन मेट्रोमधून करता येणार आहे. प्रथमच अशा स्वरूपात नागरिकाना गणपती बाप्पा मेट्रो मधून नेता येणार आहे. मात्र,हाच आनंद घेताना भविकांना थोडी काळजी घेण्याचे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

मेट्रो प्रशासनाने भाविकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये भाविकांनी काय करावे आणि काय करु नये याबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत. भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटताना मेट्राेची आणि स्वत:ची काळजी घ्यावी असे या सूचनांमधून मेट्राेने भावना व्यक्त केली आहे.

हे करा

- मेट्रो मधून गणपतीची मूर्ती घेऊन जायची असेल तर ती केवळ 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी.

- मूर्तीला सुरक्षित व व्यवस्थित झाकून न्या.

- कमी गर्दीच्या वेळेस मूर्ती नेण्यास प्राधान्य द्या.

- स्थानकावर लिफ्टचा वापर करा.

- मेट्रो ट्रेन आणि फलाट यांच्यामधील अंतर लक्ष्यात घ्या.

- पिवळ्या रेषेच्या मागे उभे रहा.

- ढोल ताशे, भोंगे वाजविण्यासाठी असलेल्या निर्बधांचे पालन करा,शांतता राखा.

- आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

- मेट्रो ट्रेन ,स्थानक परिसर स्वच्छ ठेवा.

- एकमेकांची काळजी घेत जाण्या येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करू नका.

हे करू नका

- 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्तीला प्रतिबंध आहे.

- लाऊड स्पीकर माईक,मेगाफोन यासारख्या इलेक्ट्रिकल वस्तूंचा वापर टाळा.

- अनावश्यक गर्दी टाळा.

- गुलाल,फुले,फटाके यासारख्या वस्तूंचा वापर टाळा.

- मेट्रो ट्रेनमध्ये कोणत्याही प्रतिबंधित व ज्वलनशील वस्तुंसह प्रवास करू नका.

- मेट्रो मध्ये पूजा,आरती,जल्लोष टाळा.

- आकर्षक दिवे लाईटचा वापर टाळा

- मेट्रोच्या मालमत्तेचे नुकसान करू नका.

- गणेश मूर्ती कोणी नेत असेल तर त्याच्या जवळ गर्दी करू नका.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT