Maharashtra Temperature News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी Cool बातमी, पुढील चार दिवस उकाड्यापासून मिळणार दिलासा

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच दुपारच्या वेळेस घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून होणार सुटका. उद्यापासून पुढील ४ दिवसात राज्यातील उष्णतेत (maharashtra heat wave) मोठी घट होणार आहे. परिणामी उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Breaking Marathi News)

संपूर्ण राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांचे तापमान 41 पर्यंत पाेहचले आहे. दरम्यान कमाल तापमानात उद्यापासून पुढील ४ दिवस घट होणार असून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील चार दिवस राज्यभरतील तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे.

दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात पुण्याचे तापमान ४० च्या वर जात आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे महिन्यात ४० अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. ४० अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी.

दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT