Pimpri Chinchwad News Saam tv
मुंबई/पुणे

Crime News : सफाई कामगार आणि ट्रान्सपोर्ट मालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद

सफाई कामगार आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्यामध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील सिटी प्राईड कॉम्प्लेक्समध्ये एक सफाई कामगार आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्यामध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. आज सकाळी निगडी भागात ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेली ही फ्री स्टाईल हाणामारी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Latest Marathi News)

ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेला तीन महिन्यापासून पगार वेळेवर मिळाला नाही म्हणून तिने आपल्या मालकाला सुरुवातीला मारहाण केली. मात्र त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफिस मालकाच्या भावाने देखील सफाई कामगार महिलेला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. या घटनेत बबीता महेंद्र कल्याणी ही सफाई कामगार महिला रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली आहे.

निगडी भागातील सिटी प्राइड कॉम्प्लेक्स या ठिकाणीही घटना घडली आहे. सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये एस आर सी नावाचा ट्रान्सपोर्ट अमजद खान नामक व्यक्ती चालवतात. त्याच ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये अमजद खानचा भाऊ हर्षद खान देखील बसतो. त्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये बबीता महेंद्र कल्याणी ही महिला सफाई कामगार म्हणून काही महिन्यापासून काम करत आहे.

मात्र बबीता यांना मागील तीन महिन्यापासून वेळेवर पगार (Salary) मिळाला नसल्याने तिने आपल्या ट्रान्सपोर्टमधील मालकाच्या भावाला सुरुवातीला पगाराविषयी विचारपूस केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ वादाला सुरुवात झाली. या वादातून बबीता महेंद्र कल्याणी हिने सुरुवातीला हर्षद खानला मारहाण केली.

त्यानंतर हर्षद खाने देखील प्रतिउत्तरा खातिर बबीता महेंद्र कल्याणी ह्या सफाई कामगार महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात निगडी पोलीस स्टेशनमध्ये बबीता महेंद्र कल्याणी हिच्या फिर्यादीवरून हर्षद खान विरोधात भादवी 323, 504, 506 कलमा नुसार सध्या अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT