Guillain Barre Syndrome Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune GBS News : पुण्यात मेंदू व्हायरसचं थैमान सुरूच, जीबीएस रूग्णांची संख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

Guillain-Barre Syndrome outbreak : पुण्यात दिवसागणिक जीबीएस रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी या रूग्णांची पुण्यातील संख्या १०१ वर पोहचली आहे. सर्वाधिक प्रमाण ग्रामिण भागातील असल्याचे दिसतेय.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

Pune GBS News : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचं थैमान सुरूच आहे. दररोज या आजाराचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. रविवारी या आजाराने एका व्यक्तीचा बळी घेतला. सरकारकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय. मेंदूविषयक आजार असलेल्या जीबीएस रूग्णांची संख्या पुण्यात १०१ वर पोहचली आहे. १४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. (Pune Sees Rising Guillain-Barre Syndrome Cases, 101 Affected)

पुण्यात आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. रुग्णसंख्येने शतक ओलांडले असून १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथेही उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोफत उपचार -

पुणे शहरातील 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'च्या रुग्णांचा वैद्यकीय खर्च महापालिका उचलणार आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम'च्या ('जी.बी.एस्.'च्या) रुग्णांच्या उपचारांचा व्यय ५ लाख रुपयांपेक्षा अधिक होत आहे.

राज्य सरकारच्या 'महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने'तून या आजारांवर उपचार होत आहेत.या रुग्णांच्या उपचाराचा खर्च पुणे महापालिका उचलणार आहे. गरीब रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या रुग्णांवरील उपचाराचा खर्च अधिक आहे.उपचारांच्या खर्चात महापालिका योगदान देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत आढळून आलेल्या रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT