Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

याप्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागात मुलांना नोकरी (Job) लावण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली याप्रकरणी येरवडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सज्जन गरुड, नितीन चव्हाण आणि संतोष तौवर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हे देखील पाहा -

या तिघांविरोधात ६२ वर्षाच्या व्यक्तीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त असून येरवडा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीची व आरोपी गरुड व चव्हाण यांच्याशी ओळख होती. आरोपींनी फिर्यादीच्या दोन मुलांना महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.

त्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून पावणे सहा लाख रुपये घेतले मात्र त्यांच्या मुलांना नोकरी लावून दिली नाही. यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. पण, हे आरोपी पैसेही परत करत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बैलपोळा सणाला काळाचा घाला; ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू, खाटेवरून मृतदेह गावात आणला

Maharashtra Live News Update: अमित ठकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट, नेमकं 'राज'कारण काय?

Tik Tok Update: भारत-चीनची हातमिळवणी, टिकटॉक भारतात पुन्हा सुरु होणार?

Mangi Tungi : नाशिकजवळची मांगी-तुंगी टेकडी; शांततेचा अनुभव

Karde Beach : कोकणच्या सौंदर्यात भर घालणारा कर्दे बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT