Palgahr News: दंड आणि कारवाई चुकवण्यासाठी पालघरमधील आड रस्त्यांचा वापर

वारंवार पोलीस प्रशासन आणि आरटीओला तक्रार करून देखील कोणती कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
Palghar News
Palghar NewsSaam Tv

पालघर - गुजरात कडून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध अवजड मालवाहू वाहनांवर केलेला दंड आणि कारवाई चुकवण्यासाठी सध्या पालघर (Palghar) मधील आड रस्त्यांचा वापर केला जातो आहे. हे आड रस्ते अरुंद आणि छोटे असल्याने या मार्गावर रात्री अवजड वाहनांचे मोठे अपघात घडतात आहेत. त्यामुळे या अवजड वाहनांचा सर्वाधिक फटका हा येथील स्थानिक नागरिकांना बसलेला दिसून येत आहे.

हे देखील पाहा -

मुंबई (Mumbai) अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील दापचरी येथे सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर आरटीओकडून अवजड वाहनांची कागदपत्र तपासली जातात. तसंच ओवरलोड मालवाहू वाहनांना मोठा दंड ही आकारला जातो. त्यामुळे हा दंड चुकवण्यासाठी अवजड वाहन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून न नेता तलासरी, उधवा, धुंदलवाडी आणि तलासरी, उधवा- सायवन या आड मार्गाने रात्रीच्या वेळी आणली जातात.

Palghar News
Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरूच, पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय होणार परिणाम?

आड मार्गाने केल्या जाणाऱ्या या वाहतुकीमुळे शासनाचा महिन्याला कोट्यावधी रुपयांचा महसूल तर बुडवला जातोच मात्र दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील रस्त्यांची अवजड वाहनांमुळे दयनीय अवस्था हि होत आहे. या आडमार्गांवर अवजड वाहनांचा अपघात झाल्यास दोन ते तीन दिवस हे मार्ग पूर्णपणे बंद होत असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पोलीस प्रशासन आणि आरटीओला तक्रार करून देखील कोणती कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com