Pratibhatai Patil Health Update  Saam TV
मुंबई/पुणे

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Satish Daud

Pratibhatai Patil Health Update

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांकडून प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना अनेकजण करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष असून त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. २००७ ते २०१२ या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं होतं. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नाहीये. बुधवारी (ता. १३) अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना पुणे (Pune News) येथील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सध्या डॉक्टरांच्या मदतीने प्रतिभाताईंवर उपचार सुरू आहेत. कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली.  (Latest Marathi News)

आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री, असे मंत्रीपदे भूषवत विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड, राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या.

त्यानंतर राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या. राष्ट्रपती पदावर असताना प्रतिभाताई पाटील यांनी संपूर्ण जगात त्यांनी भारताची नवी ओळख करून दिली.

त्या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू’ राष्ट्रपती ठरल्या. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेपुढे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT