former mla vinod ghosalkar Saam tv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar Case : अभिषेक यांना विश्वासघाताने संपवले; वडील विनोद घोसाळकर नेमकं काय म्हणाले?

Vinod Ghosalkar Latest News : घोसाळकरांच्या हत्येवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या हत्येनंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवर अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी निवेदन जारी करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

Abhishek Ghosalkar News :

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. घोसाळकरांच्या हत्येवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या हत्येनंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवर अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी निवेदन जारी करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

विनोद घोसाळकर म्हणाले, 'माझा मुलगा अभिषेक यांची विश्वासघाताने निर्घृण हत्या झाली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. या घटनेमुळे आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात आहेत, असं त्यांचे वडील घोसाळकर यांनी निवेदन जारी करत म्हटलं आहे. त्यांनी किळसवाणा प्रकार थांबविण्यासाठी बजावले आहे.

'मी १९८२ पासून सक्रिय राजकारणात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केलं, असं ते म्हणाले.

'आम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहोत. आम्ही निष्कलंकपणे जीवनात वावरत आहोत. आमच्यावर कोणताही डाग नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो, त्यानंतरप विधानसभेवर निवडून आलो. अभिषेक आणि सून तेजस्वी हे सुद्धा नगरसवेक म्हणून निवडून आल आहेत. जनतेच्या प्रेम आणि विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली, असेही घोसळकरांनी नमूद केले.

'आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू असून तत्काळ हे थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल तर त्या पुराव्याच्या आधारावर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, असेही त्यांनी पुढे म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT