BJP Leader Narendra Pawar Resigns From All Party Posts साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

Narendra Pawar Resigns : कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्याविरोधात षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Ganesh Kavade

BJP Leader Narendra Pawar Resigns From All Party Posts : कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार आणि भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे. एका महिलेने नरेंद्र पवार यांच्यावर बलात्कार आरोप केल्यानंतर ठाण्यात खळबळ उडाली होती. या कारणामुळेच नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिला.

आपल्या राजीनामा पत्रात नरेंद्र पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या विरोधात मोठे षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आपली बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणांमुळे किंवा निर्माण झालेल्या वादांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी आपण स्वतःहून पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा स्वीकारला आहे.

माजी आमदार नरेंद्र पवार आणि साथीदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पडघा पोलीस ठाण्यात माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांचा साथीदार शैलेश पाटील यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेला फार्महाऊसवर नेऊन पिस्तूल दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याचा आणि व्हिडिओ काढून धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी संकटात

भाजपच्या माजी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचे निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

Hair Loss: केसांना तेल लावताना 'या' चुका करू नका; नाहीतर वाढू शकतो हेअर फॉल

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

Restart phone: फोन किती दिवसांनी रिस्टार्ट केला पाहिजे?

SCROLL FOR NEXT