Sachin Vaze And Anil Deshmukh  Saam Tv
मुंबई/पुणे

Sachin Waze: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे; सचिन वाझेचा तुरुंगातून गंभीर आरोप, पाहा व्हिडिओ

Sachin Waze on anil deshmukh : अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केला आहे. वाझेने याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी आणि सध्या तुरुंगात असलेला सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर केला आहे. सचिन वाझेच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित पोलीस अधिकारी, १०० कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझेने पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे द्यायचे. याबाबत सीबीआयकडे पुरावे आहेत, असा दावा सचिन वाझेने केला आहे. या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणात माझी नार्को टेस्ट झाली, तरी त्यासाठी मी तयार आहे. मी सर्व पुरावे दिलेले आहेत. त्या सोबत मी जयंत पाटील यांचे नावही सांगितले आहे, असाही गंभीर आरोप वाझेने तुरुंगातून केला आहे.

सचिन वाझेला वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना वाझेने अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला. देशमुखांच्या विरोधात पुरावे असून ते सर्व सीबीआयला दिल्याचे वाझेने सांगितले. यावेळी या प्रकरणात जयंत पाटील यांचं नाव घेतल्याने नवा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळत होते. चांदीवाल आयोगाची आरोप त्यांनी फेटाळला होता. याचदरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान, सचिन वाझेच्या आरोपावर अनिल देशमुख यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हॉटेल आणि बार मालकांकडून पैसे उकळण्याचं हे प्रकरण होतं. या प्रकरणातील आरोप अनिल देशमुख फेटाळत होते. अशा प्रकारचे कोणतेही पैसे स्वीकारले नसल्याचा त्यांचा आरोप होता. त्यातच या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाने या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT