New Mumbai–Pune Helicopter Ride Saam
मुंबई/पुणे

मुंबई ते पुणे गाठा अवघ्या ३० मिनिटांत, हेलिकॉप्टरने अनुभवा सुंदर प्रवास; तिकीटांची किंमत किती?

New Mumbai–Pune Helicopter Ride: फ्लायो इंडियाने मुंबई - पुणे हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. आता मुंबई - पुणे प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबई- पुणे किंवा पुणे - मुंबई असा काहींचा प्रवास होत राहतो. एक्स्प्रेस, प्रायव्हेट बस, सरकारी बस किंवा बाय रोडने देखील जाता येते. रस्तेमार्गे मुंबई ते पुणे गाठण्यासाठी एकूण दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. जर लवकर मुंबईहून पुणे गाठायचे असेल तर, विमानातून प्रवास करता येऊ शकते. मात्र, मुंबई - पुणे तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे. सामान्यांना हे दर काहीवेळेस परवडत नाहीत.

पण आता आपल्याला अवघ्या ३० मिनिटांत मुंबई ते पुणे हा प्रवास करता येईल. ही सेवा मुंबईतील विमान कंपनी फ्लायो इंडियाने सुरू केलीये. यासंदर्भात व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या नेटकरी तिकीट दर, सामान, मर्यादा आणि ड्रॉप लोकेशन्सबाबत प्रश्न विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर एअरबस ही वापरली जात आहे. हे हेलिकॉप्टर हलके आणि एकल इंजिन आहे. यातून सुरळीत प्रवास होणार आहे. फ्लायो इंडियाने यासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत हेलिकॉप्टर जमिनीवर असल्याचं दिसत आहे. प्रवाशांसाठी दरवाजा उघडले असल्याचं दिसून येत आहे. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर उड्डाण घेते. तर, काही तासांतच प्रवासी आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचतात, असंही या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ १६ नोव्हेंबरला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला तब्बल ३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंटद्वारे या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या हेलिकॉप्टर राइडची किंमत, बुकिंग प्रोसेस आणि इतर माहिती विचारली आहे. मात्र, अद्यापतरी अधिकृतरित्या या हेलिकॉप्टरच्या राइडची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये मनसेचे नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गट संतप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाभ,फक्त करा 'हे' काम?

Crime: धारदार शस्त्रानं आधी पोट फाडलं, नंतर गुप्तांग कापून झाडाला लटकवलं; महिलेने बॉयफ्रेंडला दिला भयानक मृत्यू

'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

लेकाने आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, दोघांनी मुलाला छतावरून फेकलं, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT