Pimpri Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Hoarding Collapse: होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

Pimpri Chinchwad Hording Collapse: पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये ही घटना घडली आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमधून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. मुंबई-पुणे हायवेलगत असलेली मोठी होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांना होर्डिंगचा आधार घेतला. (Latest Marathi News)

मात्र वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग क्रेनच्या माध्यमातून होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरु आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. (Crime News Update)

ज्या ठिकाणी हे होर्डिंग आहे त्या होर्डिंगच्या खाली एक टायर पंक्चरचे दुकान होतं. पाऊस आला त्यावेळी त्या टायर पंक्चरच्या दुकानांमध्ये सात-आठ जण थांबून होते. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग टायर पंक्चरच्या दुकानावर पडली आणि त्या दुकानांमध्ये उभे असलेल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT