Ajit Pawar Latest News : गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अजित पवार हे लवकरच भाजपसोबत जाणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आज या चर्चांनी अधिक जोर धरला. कारण, अजित पवार यांनी अचानकपणे सासवडचा कार्यक्रम रद्द केला. यानंतर अजित पवार हे दिल्लीला जाणार अशाही चर्चा सुरू झाल्या.
इतकंच नाही तर, अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांची मंगळवारी बैठक बोलावली असून या बैठकीत ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा करणार आहे, अशाही उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, अजित पवार यांनी वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ट्विट करत पूर्णविराम दिलाय. (Latest Marathi News)
"मी खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे", असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. (Breaking Marathi News)
"त्याचबरोबर उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी", असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगण्यात आलंय.
अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचक विधान केलं. 'भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे' असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ. विधानसभेत अजित पवार यांच्या इतका ताकदवार नेता नाही. तेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, अशी भूमिका या दोन्ही आमदारांनी जाहीरपणे घेतली आहे. (Maharashtra Political News)
अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली. ईडी सीबीआय पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा यांचा दुरुपयोग करून दबाव टाकून शिवसेना तोंडली आणि हे सरकार बनवण्यात आलं. त्याच पद्धतीचा दबाव राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी टाकला जात आहे. त्यांना सांगितलं जात आहे की, तुम्ही राष्ट्रवादी सोडा आणि भाजपला पाठिंबा द्या”, असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.