Sinhagad Fort: भयंकर! मित्रासोबत सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेली होती तरुणी; अचानक दोन तरुण आले अन्...

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील सिंहगड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sinhagad Fort Crime News
Sinhagad Fort Crime NewsSaam TV
Published On

निलेश बोरुडे

Sinhagad Fort Crime News: पुणे जिल्ह्यातील सिंहगड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगडावर मित्रासोबत ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणीसह तिच्या मित्राला दोन अज्ञात तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटलं आहे. याप्रकरणी हवेली पोलीस (Police) ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायवाटेवर पहिल्यांदाच घडलेल्या या लुटीच्या घटनेमुळे ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  (Latest Marathi News)

Sinhagad Fort Crime News
Navi Mumbai Crime: भयंकर! मद्यधुंद कारचालकाने वाहतूक पोलिसाला १२ किलोमीटर फरफटत नेलं; थरकाप उडवणारा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, विवेककुमार बाबुलाल प्रसाद (वय 28, रा. ससाणेनगर, हडपसर) हा तरुण सुट्टी असल्याने मैत्रीणीसह सिंहगडावर (Sinhagad Fort) ट्रेकिंगसाठी गेला होता. आतकरवाडीतून पायवाटेने चालला होता. दुपारची वेळ असल्याने व ऊन जास्त असल्याने पायवाटेवर कोणीही नव्हते. सुमारे चारशे ते पाचशे मीटर चढून गेल्यावर विवेककुमारला वळणावर दोन तरुण संशयास्पद नजरेने त्याच्याकडे पाहताना दिसले.

सिंहगडावर तरुणावर कोयत्याने हल्ला

त्याला संशय आल्याने मागे राहिलेली मैत्रीण येईपर्यंत तो थांबला. काही वेळात त्याची मैत्रीण आल्यानंतर दोघेही चालू लागले. काही अंतर चालल्यानंतर वळणावर थांबलेल्या तरुणांनी अचानक विवेककुमार याच्यावर पाठीमागून काठी व कोयत्याने हल्ला (Crime News) केला. हाताला कोयता लागल्याने त्याच्या हातातून रक्त येऊ लागले. 'तुम्हाला जे पाहिजे ते देतो पण आम्हाला मारु नका' असे म्हणत विवेककुमारने जवळची रोख रक्कम त्या चोरट्यांना दिली.

एका तरुणाने युवतीच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन ओढून घेतली त्यावेळी युवती खाली पडली. ३० ते ३५ हजारांचा मुद्देमाल घेऊन ते भामटे पसार झाले. घाबरलेल्या विवेककुमारने 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना (Police) याबाबत माहिती दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून हवेली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम याबाबत अधिक तपास करत आहेत.

Sinhagad Fort Crime News
Crime News : माता न तू वैरिणी! आधी केलं मद्यपान, नंतर पोटच्या मुलींसोबत केलं भयानक कृत्य, मन सुन्न करणारी घटना

सिंहगडावर विक्रेते असते तर...

काही महिन्यांपूर्वी वन विभागाने कारवाई करुन पायवाटेवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्थानिकांच्या झोपड्या काढून टाकल्या आहेत. सध्या अत्यंत तुरळक विक्रेते पायवाटेवर आहेत. ज्या ठिकाणी ही लुटमार व मारहाण करण्यात आली आहे तेथून काही अंतरावर पूर्वी स्थानिकांची छोटी खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने होती. जर ती दुकाने असती तर ही लुटमारीची घटना घडली नसती. किमान या युवक युवतीच्या मदतीला तरी कोणीतरी धावून आले असते.

काळ सोकावू नये म्हणून तपास लावणारच...

सिंहगडावर पायवाटेने ट्रेकिंगसाठी जाणारांची संख्या खुप जास्त आहे. अनेक महिलाही ट्रेकिंगसाठी नियमितपणे येतात. जर या भामट्यांचा वेळीच शोध घेतला नाही तर पुढील काळात अशा घटना वाढतील. त्यामुळे या भामट्यांचा छडा लावण्यात येणार असून बाहेरुन येऊन अशाप्रकारे लुटमार करण्याचे धाडस कोणी करणार नाही. म्हणून स्थानिक गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com