Thane Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Metro : घोडबंदरच्या ट्रॅफिकमधून सुटका, ठाण्यात मेट्रो या महिन्यात धावणार

Ghodbunder Traffic : डिसेंबर 2025 अखेर वडाळा ते गायमुख या मेट्रो मार्गावर पहिली मेट्रो धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणेकरांची घोडबंदरच्या वाहतूककोंडीमधून सुटका होणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Thane Metro News Update : ठाणेकरांची घोडबंदरच्या वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे. कारण, ठाण्याची पहिली मेट्रो यंदा धावणार असल्याचे समोर आलेय. ठाण्यामध्ये मेट्रोचे जाळं विकसित करण्यात येत आहे. त्यातील पहिला टप्पा यंदा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्याची मेट्रो दिलेल्या डेडलाईनमध्ये (First Thane Metro to Roll Out by December 2025) सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 अखेर वडाळा ते गायमुख या मेट्रो मार्गावर पहिली मेट्रो धावेल. वडाळा ते कासारवडवली (मेट्रो 4) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो 4 अ) या दोन्ही मेट्रो मार्गावर 10 स्थानकांवर मेट्रो धावणार आहे. यंदाच्या वर्षी ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होईल अन् मेट्रोचा आनंद घेता येईल.

मुंबई आणि उपनगरीय शहरांना जोडणाऱ्या प्रकल्पातील 'मेट्रो-4' आणि 'मेट्रो 4 अ' हा मार् २०२५ अखेरीस टप्प्याटप्प्यात सुरु होणा आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे. मेट्रो-4 वडाळा ते ठाण्यातील घोडबंदरवरील कासारवडवलीपर्यंत धावणार आहे. पुढे कासारवडवली ते गायमुख हा टप्पाही सुरू होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची यंदा वाहतूक कोंडीतून सुटका निश्चित मानली जातेय.

मुंबई मेट्रो मार्ग-४ (वडाळा - कासारवडावली)

वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील. सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल. सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.

कोण कोणती ३० स्थानके असतील ?

1. भक्तीपार्कमेट्रो, 2. वडाळाटीटी, 3. अनिकनगरबसडेपो, 4. सिद्धार्थकॉलनी, 5. गरोडियानगर, 6. पंतनगर, 7. लक्ष्मीनगर, 8. श्रेयससिनेमा, 9. गोदरेजकंपनी, 10. विक्रोळीमेट्रो, 11. सूर्यानगर, 12. गांधीनगर, 13. नेव्हलहाऊसिंग, 14. भांडुपमहापालिका, 15. भांडुपमेट्रो, 16. शांग्रीला, 17. सोनापूर, 18. फायरस्टेशन, 19. मुलुंडनाका, 20. ठाणे तीनहात नाका, 21. आरटीओ ठाणे, 22. महापालिकामार्ग, 23. कॅडबरी जंक्शन, 24. माजिवडा, 25. कापूरबावडी, 26. मानपाडा, 27. टिकूजी-नि-वाडी, 28. डोंगरीपाडा, 29. विजयगार्डन, 30. कासारवडवली

मुंबई मेट्रो मार्ग 4अ (कासारवडवली - गायमुख)

कासारवडवली ते गायमुख पर्यंत मेट्रो मार्ग 4अ हा 2.7 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गावर २ स्थानके आहेत. हा मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे - कासारवडवली) या मार्गाचा कासारवडवली बाजूचा विस्तार आहे. या मार्गामुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याचा प्रवास वेळ 50% ते 75% पर्यंत कमी होईल. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८५ % स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. डिसेंबरमध्ये या मार्गावर मेट्रो धावेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT