Rajgurunagar IDBI Bank, Fire saam tv
मुंबई/पुणे

Fire Breaks Out At IDBI Bank : आयडीबीआय बँकेत भीषण आग, कागदपत्रांसह बँकेचे साहित्य जळून खाक

राजगुरुनगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर एक तासांत नियंत्रण मिळवले.

रोहिदास गाडगे

Rajgurunagar News : पुणे (pune latest news) जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातील पाबळरोड येथील आयडीबीआय बँकेत (rajgurunagar idbi bank) आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत (fire broke in idbi bank) बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळुन खाक झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अद्याप किती रुपयांचे नुकसान झाले आहे याचा तपशिल समजू शकलेला नाही. (Breaking Marathi News)

आयडीबीआय बॅंकेस आग लागल्याची माहिती राजगुरुनगर पालिकेच्या फायर ब्रिगेडला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राजगुरुनगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर एक तासांत नियंत्रण मिळवले.

पहाटेच्या सुमारास बँकेस आग लागल्याने नागरिकांना देखील घटनेची फारशी माहिती समजली नाही. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर एक तासांत नियंत्रण मिळवल्यानंतर बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळुन खाक झाल्याचे दिसून आले. तसेच काही कागदपत्र पाण्याने भिजून गेली आहे.

ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवीत हानी झाली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT