Shivendraraje Bhosale : वारसा छत्रपतींचा : उदयनराजेंनी मला शहाणपणा शिकवू नये : शिवेंद्रसिंहराजे भडकले

एम एच 11, एम एच 50 वाहनधारकांना टाेल माफी देण्यासाठी प्रयत्न हाेतील का ? असा सवाल शिवेंद्रराजेंनी केली.
Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News
Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political Newssaam tv
Published On

Shivendraraje Bhosale News : उदयनराजेंनी (udayanraje bhosale latest news) काेणत्या संस्था काढल्या आणि किती लाेकांचे संसार चालविले हे त्यांनी सांगावे. छत्रपती घराण्यात जन्मलेल्यांनी टाेला नाका चालवावा. लाेकांकडून पैसे वसूल करावेत हे कितीपत याेग्य आहे. पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे वसूली करणा-यांवर चाप लावत असतं. परंतु सध्या वेगळेच सुरु आहे असा टाेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale latest marathi news) यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांनी लगावला आहे. (Breaking Marathi News)

Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News
Chhatrapati Sambhajiraje News: शिंदे- फडणवीसांत नैतिकता असेल तर 'त्या' मगरुर मंत्र्याचा राजीनामा घेतील : संभाजीराजे छत्रपती

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले उदयनराजे नेहमी अजिंक्य उद्याेग समूहावर भ्रष्टाचाराबाबत बाेलतात त्यांनी तेच तेच जूने तुण तुणे बंद करावे. समाेरा समाेर या हे नेहमीचे डायलाॅग बंद कराव्यात. तुमच्या या डायलाॅगला आता सातारकर कंटाळले आहेत. अजिंक्यातारा सहकारी कारखाना उत्तम चालला आहे. अजिंक्यतारा कारखाना (ajinkyatara sahakari sakhar karkhana) एका हंगामात 213 कोटी रुपये शेतकऱ्यांना देतो. या कारखान्याची उलाढाल 360 काेटींची आहे हे उदयनराजेंनी समजून घ्यावे असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale, Satara, Satara Political News
Saam Impact : आश्रमातून Chulivarcha Baba गायब, दरबार भरलाच नाही (पाहा व्हिडिओ)

दरम्यान तुमच्या आघाडीने पालिकेत केलेला भ्रष्टाचार आम्ही जनतेसमाेर मांडत राहणार. सामान्य कुटुंबातील महिलेला नगराध्यक्षाचा कारभार करुन दिला नाही. गेल्या पाच वर्षात पालिका धुण्यापलीकडे तुम्ही काही केले नाही हे सातारकरांना देखील कळून चुकले आहे.

मला शहाणपणा शिकवू नका

माझ्या सारखी छत्रपतींच्या घराण्यात कशी जन्मली असे उदयनराजेंनी म्हटलं हाेते. मी तर म्हणताे टोलनाका चालवणाऱ्यांचा जन्म घराण्यात कसा झाला. छत्रपतींचा वारसा सांगणा-यांनी लाेकांना त्रास द्यायचा, दादागिरी करायचे असे वागावे का. सगळ्यांना सगळ माहित आहे. त्यामुळे टाेल नाका चालविणा-या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये असा इशारा देखील शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com