Mumbai Fire Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत दोन ठिकाणी आगीच्या घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire update : मुंबईत दोन ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

Vishal Gangurde

मुंबईत दिवसभरात दोन ठिकाणी आगीच्या घटना

विक्रोळी आणि कुर्ला येथे आगीच्या घटना

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

मुंबईतील दिवसभरात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील विक्रोळी आणि कुर्ला येथे आज बुधवारी दुपारी आगीच्या घटना घडल्या. आग लागल्यानंतर नागरिकांची एकच धावाधाव झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचले.

विक्रोळीत कार जळून खाक

मुंबईतील विक्रोळी पूर्व टागोर नगर ग्रुप नंबर तीन या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. तर सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या यशस्वी प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. याच कारच्या आजूबाजूला अनेक गाड्या पार्किंग होत्या. सुदैवाने या गाड्यांना आग लागली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली आहे, याची अद्याप माहिती समोर आली नाही. पोलीस आणि अग्निशमन दल याचा अधिक तपास करत आहेत.

कुर्ल्यात हॉटेलला आग

कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील सन लाईट हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. सन लाईट हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला ही आग लागली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

बीडमध्ये बिअर अँड रेड वाईन शॉपला आग

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल शंतनू सुखसागर बिअर अँड रेड वाईन शॉपला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी प्रसंगाधावून अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT