Pankaja Munde’s PA Anant Garje Wife End Life Saam Tv
मुंबई/पुणे

Anant Garge Case: पंकजा मुंडेंच्या पीएसह ३ जणांविरोधात गुन्हा, बायकोची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Pankaja Munde’s PA Anant Garje Wife End Life: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची बायको डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अनंत गर्जे त्यांची बहीण आणि भाऊ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Priya More

Summary -

  • डॉक्टर गौरी- पालवे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

  • पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

  • कुटुंबीयांनी गौरीची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला

  • विवाहबाह्य संबंध, मानसिक त्रास आणि कौटुंबिक वादामुळे गौरीने केली आत्महत्या

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची बायको डॉक्टर गौरी गर्जे-पालवे यांनी आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणात वरळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गौरी यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनंत गर्जेसह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी गौरी यांचा नवरा अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हे तिघेही सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

डॉक्टर गौरी गर्जे यांनी शनिवारी रात्री वरळीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. गौरी यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. गौरी यांचे नातेवाईक वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. त्यांच्या तक्रारीनंतर गौरी यांचा नवरा, नणंद आणि दिराविरोधात मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१ (२) अंतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत गर्गेचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती गौरी यांना मिळाली होती. याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते. गौरी यांना आत्महेत्येपूर्वी अनंतचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाली होती. त्यामुळे गौरी खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. ती कागदपत्रे आम्हाला पाठवली होती असा जबाब गौरीच्या वडिलांनी केला आहे. गौरी यांना समजावून सांगून देखील ते मोबाइलवर सतत चॅटिंग करायचे यावरून गौरी आणि त्यांच्यामध्ये वाद होत होते. शनिवारी देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केली त्यावेळी अनंत घरामध्ये होता असा आरोप गौरी यांच्या मामांनी केला आहे.

दरम्यान, याचवर्षी ७ फेब्रुवारीला दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. या लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. अनंत गर्जे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपुरी येथील रहिवासी आहेत. तर त्यांची बायको डॉक्टर गौरी पालवे या बीडच्या रहिवासी होत्या. ७ फेब्रुवारीला दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. या लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. डॉक्टर गौरीच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Kebab Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवा कुरकुरीत, मसालेदार व्हेज मटर कबाब

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली

कल्याण अर्णव खैरे आत्महत्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या तपासात मोठी माहिती उघड

Skin Care: चेहऱ्यावरील रिंकल्स कमी करुन सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहरा पाहिजे असेल, तर तुमच्या खाण्यात 'या' गोष्टी करा ट्राय

PAचा फोन आला, पत्नीच्या आत्महत्येने आक्रोश; गौरी गर्जे प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेकडून कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT