पुणे - महाराष्ट्रात Maharashtra गेल्या दोन दिवसात तीन आत्महत्या Suicide झाल्या आहे. एका शेतकऱ्याने नांदेडमध्ये Nanded तहसील कार्यालयावर आत्महत्या केली तर पुण्यामध्ये कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी खंडणी खोरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि तिसरी आत्महत्या एमपीएससी परीक्षा MPSC उत्तीर्ण होऊन सुद्धा नोकरी न दिल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. हे निष्क्रिय सरकार आणि प्रशासनाचे अपयश आहे. महाराष्ट्रात नोकर भरती प्रक्रिया बंद आहे १२००० पोलीस भरतीचा गाजर दाखवले परंतु वर्षाभरात भरती अजून झालेली नाही. कोरोना Coronaमहामारी व लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती आर्थिक अडचणी मध्ये आणि मानसिक दृष्ट्या संकटात आहे. स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणी निष्क्रिय प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे Santosh Shinde यांनी केली आहे.
हे देखील पहा -
महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. परंतु त्यावर कोणीही बोलत नाही.राज्यात ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. मराठा आरक्षण रद्द केलं गेलं. धनगर समाजाला जाणीवपूर्वक आरक्षण लागू केलं जात नाही. हे प्रश्न प्रलंबीत असताना राजकीय सत्ताधारी आणि विरोधी मंडळी आरक्षण विषयाचा फुटबॉल करून तरुणांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत आहे हे दुर्दैवी आहे. म्हणून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन घेऊन राज्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा घरात होणाऱ्या आत्महत्या आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या दारात होतील किंवा गळ्यात पडून होतील हे नेत्यांनी वेळीच समजून घ्यावे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावावे अशी देखील मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.