Hotels  Saam TV
मुंबई/पुणे

FDA action on Mumbai Hotels : मुंबईतील प्रसिद्ध १५ हॉटेल्सना टाळं, FDAची धडक कारवाई

Mumbai News : बिना परवाना हॉटेल चालवणाऱ्या आणि किचनमध्ये साफसफाई न ठेवणाऱ्या मुंबईतील १५ हॉटेल्सवर एफडीएने कारवाई केली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात मृत उंदीर आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA ) विभागाचे अधिकारी अॅक्टिव्ह झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

बिना परवाना हॉटेल चालवणाऱ्या आणि किचनमध्ये साफसफाई न ठेवणाऱ्या मुंबईतील १५ हॉटेल्सवर एफडीएने कारवाई केली आहे. हे हॉटेल बंद (Work Stop Notice) करण्याची नोटीस एफडीएने दिली आहे.

एफडीएने मुंबईच्या झोन १३ मध्ये आतापर्यंत १५१ हॉटेल्सची तपासणी केली आहे. यातील १३७ हॉटेल्सना इम्प्रुव्हमेंट नोटीस देण्यात आली आहे. या हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आपल्यापैकी अनेक जण हॉटेलची जातात किंवा पार्सल जेवण मागवतात. मात्र समोर चकाचक दिसणाऱ्या हॉटेलचं किचन कसं आहे, याची काहीच कल्पना नसते. गेल्या महिन्यात मुंबईत एका प्रसिद्ध हॉटेलची एफडीएन तपासणी केली. त्यावेळी हॉटेलमध्ये उंदीर, किडे त्यांना आढळले. त्यानंतर एफडीएने तत्काळ ह़ॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते. या हॉटेलचं लायसन्सदेखील संपलं होतं.

एफडीएची चेक लिस्ट

एफडीआय फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाची (FSSAI) एक चेक लिस्ट असते. त्याच आधारे हॉटेलची तपासणी केली जाते. अनेक हॉटेल्स नियमांची पायमल्ली करतात. आधी हॉटेल्सना याबाबत नोटीस दिली जाते. काही हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मात्र तरीही नियमांचं पालन झालं नाही तर अशा हॉटेल्सवर एफडीएकडून कडक कारवाई केली जाते.

तुम्हीही तक्रार करु शकता

तपासणी दरम्यान अनेक हॉटेल्समध्ये साफसफाई नसते. किचण खाणेरडं असतं. कचऱ्याच्या डब्ब्यांना नियमानुसार झाकण हवं. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातात ग्लोव्ह्ज, डोक्यावर टोपी घातलेली असावी. अशा अनेक नियमांचं पालन हॉटेल्सकडून केलं जात नाही. तुम्हालाही अशाप्रकारे कोणत्या हॉटेल्सची तक्रार करायची असल्यास तुम्ही https://foscos.fssai.gov.in/consumergrievance/ वर तक्रार करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT