FDA  Saam tv
मुंबई/पुणे

तुकाराम मुंढेंचा मुंबईत कारवाईचा धडाका; FDA कडून २,५१० लिटर सॉस, ११.१९ लाखांचे एनर्जी ड्रिंक जप्त, व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

tukaram mundhe : तुकाराम मुंढे यांनी मुंबईत कारवाईचा धडाका लावलाय. FDA कडून २,५१० लिटर सॉस, ११.१९ लाखांचे एनर्जी ड्रिंक जप्त करण्यात आले आहेत.

Saam Tv

तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून मुंबईत कारवाईचा धडाका

साकीनाक्यात २,५१० लिटर सॉस जप्त

धारावीत ११.१९ लाखांचा एनर्जी ड्रिंक साठा जप्त

संजय गडदे, साम टीव्ही

अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट व नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत मुंबईत दोन ठिकाणी धडक कारवाई केली आहे. साकीनाक्यातील सॉस उत्पादन करणाऱ्या आस्थापनेवर आणि धारावीतील एनर्जी ड्रिंकच्या घाऊक विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईत हजारो लिटर सॉस आणि सुमारे ११.१९ लाख रुपयांचा एनर्जी ड्रिंकचा साठा जप्त करण्यात आलाय.

एफडीएला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे १६ जून रोजी साकीनाका येथील मे. रती एंटरप्राइजेस, एस. जी. के. मंजिल, मोहिली व्हिलेज, खैरानी रोड येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेत आवश्यक अटींचे पालन होत नसल्याचे, उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये विविध त्रुटी असल्याचे तसेच उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आणि भेसळीबाबत संशयास्पद बाबी आढळून आल्या. यानंतर चिली सॉस आणि सोया सॉसचा एकूण २,५१० लिटर साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजे किंमत ३२ हजार ६३० रुपये आहे.

सदर उत्पादनांचे अधिकृत नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच आस्थापनेतील त्रुटींचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील आदेश मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान, १५ जून रोजी धारावीतील प्रेमनगर परिसरातील मे. रियांश एंटरप्रायझेस या घाऊक विक्रेत्याच्या आस्थापनेवर छापा टाकण्यात आला. येथे ‘Cloud Nine Energy Drink Classic, 250 ml’ या उत्पादनाच्या लेबलिंगमध्ये अन्न सुरक्षा व मानके विनियम २०२० चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुमारे ११ लाख १९ हजार ४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

एफडीएच्या माहितीनुसार, उत्पादनाच्या लेबलवर ‘Added Sugar’चे प्रमाण नमूद करण्यात आले नव्हते. तसेच जीवनसत्त्वांसारख्या पोषक घटकांची माहिती शिफारस केलेल्या दैनिक आहार भत्त्याच्या (RDA) टक्केवारीत देण्यात आलेली नव्हती. या त्रुटी नियमांचे उल्लंघन ठरत असल्याने संबंधित उत्पादनाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loose Motion : उलट्या- जुलाब होतायत? चुकूनही खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा...

Skin care: दररोज सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे? त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे 5 कारण

दारू पार्टीत नको ते घडलं; मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा, तरुण थेट ICU मध्ये

खासदारांची फोडाफाडी का होतेय? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

Operation Tiger: पुन्हा काय झाडी, काय डोंगर... ठाकरेंच्या त्या खासदारांना दिल्लीतून तडकाफडकी हलवलं, आता कुठं?

SCROLL FOR NEXT