Pune Mawal Saam
मुंबई/पुणे

Mawal Tragedy: हृदयद्रावक !'फादर्स डे'लाच मृत्यूने गाठलं; इंद्रायणीत बाप-लेक बुडाले

Bridge Collapse in Mawal: मावळातील कुंडमळा येथे पूल कोसळून चार जणांचा मृत्यू, त्यात बाप-लेकाचा समावेश. ५१ जखमी. फादर्स डेला झालेली ही दुर्घटना सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhagyashree Kamble

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे १६ जून रोजी इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल कोसळला . यामुळे भीषण दुर्घटना घडली. सुमारे ५० हून अधिक पर्यटक पुलावर असताना, काही क्षणातच पुलाचा मधला भाग कोसळला आणि पर्यटक थेट नदीत कोसळले. फादर्स डे आणि रविवारची सुट्टी असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. माने बाप लेकही पुलावर गेले होते. मात्र, सेलिब्रेशनपूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं.

फादर्स डेला वडील अन् मुलाचा मृत्यू

कुंडमळा पूल कोसळल्यानंतर काही क्षणात पुलावरील पर्यटक खाली कोसळले. या अपघातात एका बाप लेकाचाही समावेश होता. रोहित माने आणि त्यांचा मुलगा विहान माने या दोघांना आपला जीव गमवावा लागला. फादर्स डेचं सलिब्रेशन करण्यासाठी दोघेही बाप लेक कुंडमळावर गेले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. फादर्स डेच्या दिवशीच दोघांचाही मृत्यू झाला. यामुळे परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. याशिवाय या अपघातात चंद्रकांत साठले यांचाही अपघातात मृत्यू झाला. तर, चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

पावसाळ्यानिमित्त निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या पुलावर गर्दी करत असतात. रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी तोबा गर्दी जमली होती. दुपारी ३ च्या सुमारास त्या ठिकाणी धो धो पाऊस पडत होता. पूल ३० वर्ष जुना असल्यामुळे जीर्ण अवस्थेत होता. कोणत्याही क्षणी पडेल, अशा स्थितीत होता. काही मिनिटात गर्दी वाढू लागली. पुलाला गर्दीचं वजन पेलवलं गेलं नाही. काही सेंकदात पूल खाली कोसळले आणि नदीत काही जण पडून वाहून गेले.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ मदतीसाठी धावून गेला. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. सध्या जुन्या पुलाची डागडुजी का केली नाही? खबरदारी का घेतली गेली नाही? असा सवाल विरोधक आणि स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

SCROLL FOR NEXT