Mumbai Lift News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा-नातू लिफ्टमध्ये अडकले, 'ओटीस' कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News : लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर बंद पडल्याने अजिंक्य शिंदे आणि त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा आर्यवर शिंदे हे लिफ्टमध्ये अडकले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर या दोघांची लिफ्टमधून सुटका करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे | मुंबई

Mumbai News :

मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील एका उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये निवृत्त पोलीस महानिरीक्षक शशिकांत शिंदे यांचा मुलगा आणि नातू अडकल्याची घटना रविवारी घडली. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चॅलेंजर टॉवरमधील सहाव्या मजल्यावरून खाली उतरताना ही घटना घडली. (latest marathi news)

लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर बंद पडल्याने अजिंक्य शिंदे आणि त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा आर्यवर शिंदे हे लिफ्टमध्ये अडकले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर या दोघांची लिफ्टमधून सुटका करण्यात आली. याप्रकरणी ओटीस या लिफ्ट कंपनीविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शशिकांत शिंदे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझा मुलगा आणि नातू लिफ्टमधून खाली जात होते. मात्र अचानक लिफ्ट बंद पडली. तिथे लोकांनी आरडोओरडा केला. त्यावेळी मी सिक्युरिटीला बोलावलं. त्यावेळी सिक्युरिटीने देखील हात करत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावावं लागेल असं सांगितलं.

मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांना येण्यास उशीर होणार होता. कंपनीच्या लोकांशी मी स्वत: बोलण्याचा प्रयत्न केला. कंपनीने माणूस पाठवत असल्याचं सांगितलं. त्यानंतर जवळपास ४० मिनिटांनी कंपनीने एका दुसऱ्याच कंपनीच्या व्यक्तीला तिथे पाठवलं. मात्र तिथे आल्यानंतर सिक्युरिटीला चावीच सापडत नव्हती. असा सगळा ढिसाळ कारभार सुरु होता, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

या प्रकरणी ओटीस कंपनीचं लायसन्स रद्द झालं पाहिजे. कारण अशा घटना घडल्यास काय करावं, अशी यंत्रणाच कंपनीकडे नसल्याचं आढळलं आहे. उद्या एकदा वयस्कर लोक, लहान मुले एकटे अडकल्यास काय होईल? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील शशिकांत शिंदे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT