Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा कुणाला आणि कसा फायदा होणार?

Mumbai Coastal Road Update: मुंबईतल्या कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या कोस्टल रोडचा फायदा कुणाला आणि कसा होणार आहे, हे आपण जाणून घेऊ या.
Mumbai Coastal Road
Mumbai Coastal RoadYandex
Published On

Mumbai Coastal Road Phase 1

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या कोस्टल रोडचं उद्घाटन पार पडत आहे. त्यानंतर १२ मार्चपासून मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला होणार (Mumbai Coastal Road) आहे. या मार्गावरून मुंबईकरांना १२ मार्चपासून सकाळी ८ वाजेपासून प्रवास करता येणार आहे. (latest marathi news)

कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किमी लांब आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले (Mumbai Coastal Road Project) आहेत. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, उन्नत रस्ते, पूल यांचा समावेश आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोस्टल रोडचा फायदा कसा होणार?

दक्षिण-उत्तर पसरलेल्या मुंबईभर रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे आहे. परंतु वाढती लोकसंख्या आणि वाढलेल्या वाहनांमुळे नागरिकांना नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीतून सुटका (Mumbai Coastal Road Benefits) व्हावी. प्रवासाचा वेळ आणि इंधनात बचत व्हावी, या अनुषंगाने महानगरपालिकेने नरिमन पॉईंटपासून दहिसर-विरारपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे.

या रोडमुळे वेळेची अंदाजे ७० टक्के बचत होईल. तर इंधनात ३४ टक्के बचत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पर्यायाने विदेशी चलनातही मोठी बचत तर होणार आहे. परिणामी प्रदुषणातही घट होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

Mumbai Coastal Road
Mumbai Costal Road Map News : मुंबई मधील कोस्टल रोड कुठून कसा जाणार? जाणून घ्या!

कसा आहे कोस्टल रोड?

कोस्टल रोडमध्ये वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या प्रकल्पात बोगद्यात ६ व इतर ठिकाणी ८ मार्गिका (Mumbai Coastal Road Phase 1) आहेत. तसेच सुमारे ४ मजली इमारतीइतकी उंची, १२.१९ मीटर व्यास, ८ मीटर लांबी व तब्बल २८०० टन वजनाच्या टीबीएम संयंत्राचा उपयोग करण्यात आला आहे.

या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर करण्यात आले आहे. अग्नीप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच या बोगद्यामध्ये अत्याधुनिक सकार्डो वायूविजन सिस्टिम ( Mumbai News) आहे. याचबरोबर आपत्कालीन उपाययोजना करण्याता आल्या आहेत. दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे देखील आहेत.

Mumbai Coastal Road
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचे काम कुठपर्यंत आलं? मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com