Baramati Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati Accident News: पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी अन् पिकपचा भीषण अपघात; वारकरी जखमी

जखमींमध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे. हे वारकरी आळंदीसाठी निघाले होते.

मंगेश कचरे

Baramati Accident News Today: पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे कडून वाल्हेकडे निघालेल्या पिकअप टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. (Latest Marathi News)

एसटीचा (ST) टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये एसटीतील 6 जण जखमी झाले आहेत. यातील एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. (Accident News)

जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे. हे वारकरी आळंदीसाठी निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार पालखी महामार्गावर जेजुरी (Jejuri) जवळील भोर वाडी फाटा येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारी एस.टी बस आणि कोंबड्यांची वाहतूक करणारा पीक अप यांची सामोरा समोर धडक झाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघाताचे वृत्त कळताच जेजुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेजुरी देव संस्थान आणि खासगी रुग्णालयातील दोन अशा तीन रुग्णवाहिकांसह अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT