March Holiday 2026 : मार्च महिन्यात किती सुट्ट्या अन् कुठले सण असणार? संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

March 2026 Festival Date: मार्च २०२६ मध्ये होळी, गुढीपाडवा, राम नवमी, महावीर जयंतीसह अनेक महत्त्वाचे सण आणि सुट्ट्या आहेत. योग्य नियोजन केल्यास या महिन्यात ६ ते ८ दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेता येईल.
March 2026 Holiday List India
March 2026 Holiday List Indiagoogle
Published On

मार्च महिना सुरु झाल्याझाल्या सुट्ट्यांचा पाऊस पडणार आहे. शाळा, कॉलेज आणि कर्मचाऱ्यांना या महिन्यात बऱ्याच सुट्ट्या मिळणार आहेत. तसेच हिंदू कॅलेंडरनुसार या महिन्यात नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. मार्च महिना हा फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या त्रयोदशी तिथीपासून सुरु होऊन महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समाप्त होईल. तर पुढे आपण या महिन्यातल्या सणांबाबत जाणून घेणार आहोत.

मार्च महिन्याच्या एकूण सुट्ट्या किती?

१ मार्च २०२६ (रविवार) - प्रदोष व्रत

भगवान शंकराची पूजा करण्याचा दिवस.

२ मार्च २०२६ (सोमवार) - होळी

रंगांचा आणि आनंदाचा सण. वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.

३ मार्च २०२६ (मंगळवार) - धूलिवंदन, चंद्रग्रहण

होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. याच दिवशी चंद्रग्रहण आहे.

४ मार्च २०२६ (बुधवार) - होळी, चैत्र महिन्याची सुरुवात, हिंदू नववर्ष

चैत्र महिन्याची सुरुवात आणि हिंदू नववर्षाचा प्रारंभ.

March 2026 Holiday List India
Throat Cancer Stage 4: ७४ वर्षीय रुग्णाने चौथ्या टप्प्यातील घशाच्या कर्करोगावर अशी केली मात, डॉक्टरांच्या जिद्दीला सलाम

६ मार्च २०२६ (शुक्रवार) - संकष्टी चतुर्थी

भगवान गणपतीची उपासना करण्याचा दिवस.

८ मार्च २०२६ (रविवार) - जागतिक महिला दिन, रंगपंचमी

महिलांच्या सन्मानाचा दिवस. रंगपंचमीला रंग खेळले जातात.

११ मार्च २०२६ (बुधवार) - शीतला अष्टमी / कालाष्टमी

देवी शीतला आणि भगवान भैरव यांची पूजा केली जाते.

१५ मार्च २०२६ (रविवार) - पापमोचनी एकादशी

भगवान विष्णूची पूजा करण्याचा पवित्र दिवस.

१६ मार्च २०२६ (सोमवार) - प्रदोष व्रत

शंकराची आराधना करण्याचा दिवस.

१७ मार्च २०२६ (मंगळवार) - मासिक शिवरात्री

दर महिन्याला येणारी शिवरात्री.

१८ मार्च २०२६ (बुधवार) - दर्श अमावस्या

अमावस्येचा दिवस, पितरांचे स्मरण केले जाते.

१९ मार्च २०२६ (गुरुवार) - गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात

मराठी नववर्षाचा पहिला दिवस. नवरात्री उत्सवाची सुरुवात.

२२ मार्च २०२६ (रविवार) - विनायक चतुर्थी

गणपतीची पूजा करण्याचा दिवस.

२६ मार्च २०२६ (गुरुवार) - राम नवमी

भगवान रामांचा जन्मोत्सव.

२९ मार्च २०२६ (गुरुवार) - कामदा एकादशी

विष्णूभक्तांसाठी महत्त्वाचा उपवासाचा दिवस.

३१ मार्च २०२६ (मंगळवार) - महावीर जयंती

भगवान महावीरांचा जन्मदिन.

मार्च २०२६ मध्ये किती मुख्य सुट्ट्या असतील?

२ प्रमुख राष्ट्रीय/धार्मिक सुट्ट्या (होळी आणि ईदीच्या दिवशी असतील)

५ रविवार

४ शनिवार (काही संस्थांमध्ये सुट्ट्या असू शकतात)

काही ठिकाणी १९ मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी दिली जाईल.

काही ठिकाणी ३१ मार्च रोजी महावीर जयंतीची सुट्टी

एकंदरीत, योग्य नियोजन केल्याने मार्चमध्ये ६-८ दिवसांच्या सुट्ट्या मिळू शकतात.

March 2026 Holiday List India
Holi 2026 Maharashtra: यंदा होळी नेमकी कधी? पंचांगकर्ते मोहन दातेंनी सांगितला नेमका मुहूर्त आणि दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com