

स्प्लिट्सविला 7 फेम आणि मिस्टर इंडिया विजेता मयंक पवारचे निधन
वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला
मयंकच्या निधनामागचे कारण अद्याप समोर आले नाही
मयंकच्या निधनाने त्याचे चाहते आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा
टीव्ही इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मिस्टर इंडिया आणि एमटीव्ही स्प्लिट्सविला सीजन ७ चा सर्वात चर्चेत राहिलेला स्पर्धक आणि फिटनेस चॅम्पियन मयंक पवारचं निधन झालं. त्याच्या निधनामागचं कारण समोर आलं नाही. मयंकच्या भावाने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निधनाबाबत माहिती दिली. मयंकचं अचानक निधन झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.
मयंकच्या निधनाची बातमी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आली. सोशल मीडियावर त्याच्या निधनाबाबतची पोस्ट व्हायरल होत आहे. मयंकचे अचानक निधन झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मयंक आपल्यात नाही यावर त्यांना विश्वास बसत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान. मयंक नेहमीच आपल्या हृदयात राहील.'
मयंक हा फक्त टीव्ही स्टार नव्हता तर तो फिटनेस जगतातील एक दिग्गज व्यक्तीमत्व होता. तो त्याच्या कठोर परिश्रमाच्या माध्यमातून अनेक तरुणांसाठी एक खरा आदर्श आणि मार्गदर्शक बनला होता. मयंक पवारची ओळख फक्त रिअॅलिटी शोपुरती मर्यादित नव्हती. तर तो फिटनेस जगतातील एक दिग्गज व्यक्तीमत्व होता.
मयंकने सात वेळा 'मिस्टर इंडिया' हा किताब जिंकला होता. मयंक हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून प्रसिद्ध होता. फिटनेस जगतात त्याचे नाव प्रसिद्ध होते. त्याच्या प्रभावी शरीरयष्टी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल तो अनेकदा चर्चेत असायचा. त्याचा फिटनेस आणि किलर बॉडी हा नेहमी चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या मृत्यूमागचे खरं कारण समोर आले नाही. त्याचे हे अचानक जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून देणारे ठरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.