Pune Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुणे-बंगळुरु महामार्गावर बस अन् ट्रकचा भीषण अपघात; २ जखमी

आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Shivani Tichkule

Pune Accident News Today: पुणे बंगळुरु महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. डुक्कर खिंड येथे ट्रकला पाठीमागून बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. (Latest Marathi News)

मुंबईच्या दिशेने जाताना चांदणी चौकात हा अपघात झाला. ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात (Accident) ट्रकचालक आणि बस मधील एक महिला जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Pune News)

बुलढाण्यात ट्रॅक्टर पलटी होवून चालक ठार!

बुलढाण्यात (Buldhana) देखील भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी होवुन चालक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील लाखनवाडा - जयरामगड रोडवर घडली आहे.

संतोष श्रीकृष्ण गवई वय (अं ३२ वर्षे रा. कंचनपुर ता.खामगाव) हा नांगरटी करण्यासाठी कंचनपूरहून लाखनवाडा येथे गेला होता. नांगरटी करून तो पुन्हा कंचनपूर येथे परत येत होता. त्यावेळी त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याले ट्रॅक्टर पलटी झाला आहे. त्याच ट्रॅक्टर खाली येऊन संतोष श्रीकृष्ण गवई याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT