Pune Loksabha Byelection : पुणे लोकसभा जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच; अजित पवारांच्या वक्तव्याने टेन्शन वाढलं

Pune Loksabha Byelection : पुणे लोकसभेच्या जागेवर दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.
Solapur News Congress NCP
Solapur News Congress NCPSaam tv
Published On

अक्षय बडवे

Pune News : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार  गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून अनेकांची नावं चर्चेत आहेत. महाविकास आघाडीत पुणे लोकसभा निवडणुकीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे.

पुणे लोकसभेच्या जागेवर दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही नावांची चर्चा सुरु आहे. या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे.  (Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे पुण्याच्या जागेवर दावा ठोकला. त्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी आमदार मोहन जोशी यांनी देखील ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे सांगितले आहे. (Latest News Update)

Solapur News Congress NCP
Pune Loksabha Byelection: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज? भाजपकडून उमेदवारीसाठी काही नावांची चर्चा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आले आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीच्या जागावाटपाचा निमित्ताने झालेल्या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे जाहीर झाले आहे. तरीही पुण्याच्या जागेवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा दावा केल्याने काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला आहे.

Solapur News Congress NCP
Mumbai Crime: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई युवा अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्लेखोरांनी चाकूने केले सपासप वार

काय म्हणाले अजित पवार?

लोकसभेच्या निवडणुकीला एकच वर्ष राहिलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. मला आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवडणूक लागल्यानंतर ज्या मित्रपक्षापैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. आमदारकीच्या निवडणुकीत कोणाला किती मतं पडली याची माहिती घेतल्यानंतर अंदाज येतो, असं अजित पवारांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com