farmers demands sugarcane cutting to sant tukaram sahakari sakhar karkhana saam tv
मुंबई/पुणे

Maval : संत तुकाराम' साखर कारखान्याकडून ऊसतोडीस विलंब, उत्पादक शेतकरी नाराजी

योग्य ऊस तोडीचे नियोजन व पुरेसे मनुष्यबळ व सुसज्ज यंत्रणा उपलब्ध नसेल तर कारखान्याने शेतकन्यांची दिशाभूल करू नये असे मुळशीतील शेतकरी सांगताहेत.

दिलीप कांबळे

Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana :

मुळशीच्या चिखलगाव येथील शेतकऱ्यांच्या उसाची चौदा महिने उलटले तरी उसतोड झालेली नाही. यामुळे संत तुकाराम साखर कारखान्याबाबत (sant tukaram sahakari sakhar karkhana) ऊस उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.  शेतकरी लहू फाले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याने ऊस तोडावा म्हणून कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांची भेट घेतली होती. तरीही काहीही उपयोग झाला नाही. (Maharashtra News)

शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये ऊस लागवड केली होती. त्यास आता चौदा महिने पूर्ण झाले आहेत. उशिरा ऊस तोडीने वजन कमी भरते. परिणामी वजनाने कमी भरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

पुढील वर्षांतील खोडवा व चालू ऊस लागवडीची मशागत, खते, पाणी यांचे नियोजन कोलमडले आहे. यास सर्वस्वी जबाबदार कारखानाच आहे, अशी ऊस उत्पादक शेतकरी यांनी चिंता व्यक्त केली. तर दुसरीकडे साखर कारखान्याकडे अधिकारी, कर्मचारी हे आमच्याकडे ऊस तोडीसाठी यंत्रणाच उपलब्ध नाही, अशी कारणे सांगत आहेत.

पाच तालुक्यावर अवलंबून असलेला साखर संत तुकाराम साखर कारखानाकडे ऊस तोडण्यासाठी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांस ऊस लागवड करा असे का सांगितले जाते. एकीकडे ऊस लागवडीसाठी मेळावे घेऊन ऊस लावण्याबाबत प्रोत्साहन द्यायचे, तर दुसरीकडे ऊसतोड उशिरा करायची असा विरोधाभास बघावयास मिळतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योग्य ऊस तोडीचे नियोजन व पुरेसे मनुष्यबळ व सुसज्ज यंत्रणा उपलब्ध नसेल तर कारखान्याने शेतकन्यांची दिशाभूल करू नये. शिल्लक उसाची कारखान्याने पाहणी करून नुकसान भरपाई म्हणून अतिरिक्त अनुदान द्यावे अशी मागणी मुळशीतील शेतकरी करू लागले आहे. दरम्यान संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून कोणीही यावर बोलायला तयार नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT