Potholes : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त की युक्त, चारोटीमधील वाहनधारकांचा सवाल

Mumbai Ahmedabad National Highway : डहाणू येथील काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेऊ लागले आहे. यामुळे माेठा निधी वाया जाणार की काय ?
mumbai ahmedabad national highway
mumbai ahmedabad national highwaysaam tv

Palghar :

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (mumbai ahmedabad national highway) खड्डे मुक्त करण्यासाठी या महामार्गाचं मुंबईच्या सीमेवरील दहिसर ते गुजरातच्या सीमेवरील अछाड पर्यंत जवळपास एकशे वीस किलोमीटर पेक्षाही जास्त कॉंक्रिटीकरणाच काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तब्बल 620 कोटी रुपये निधी खर्च करणार आहे. परंतु कॉंक्रिटीकरणाच्या कामाला डहाणूतील चारोटी येथे भले मोठे खड्डे पडल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त करण्यासाठी एका बाजूला कॉंक्रिटीकरण सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र झालेल्या काँक्रीटला खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेऊ लागले आहे. अवघ्या काही दिवसातच या काँक्रिटीकरणाला तडे जाऊ लागले असून डहाणूतील चारोटी येथे भले मोठे खड्डे देखील पडले आहेत.

mumbai ahmedabad national highway
SSC Exam 2024 : दहावीचा पेपर सुरु असताना पाेरं शाळेच्या भितींवर चढली, कॉपी बहाद्दरांना केला पूरवठा; व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती

त्यामुळे हा महामार्ग खड्डे मुक्त करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असतानाच हा शासनाचा पैसा वायफळ तर जाणार नाही ना ? असा प्रश्न आता येथील वाहन चालक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mumbai ahmedabad national highway
Vinayak Raut : आंबोली ग्रामस्थांच्या पाठिशी विनायक राऊत; अनधिकृत बांधकाम पाडण्याची केली मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com