ravikant tupkar news  saam tv
मुंबई/पुणे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी आक्रमक; रविकांत तुपकर मंत्रालयाशेजारील समुद्रात करणार जलसमाधी आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार आहे.

लक्ष्मण सोळुंके

Ravikant tupkar News : शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. अतिवृष्टीतील नुकसान भरपाई दिली नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार असून जालन्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. (Latest Marathi News)

राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं कापूस सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, सरकारनं शेतकाऱ्यांना (Farmers) कोणतीही मदत केली नाही, असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.

त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रीची नव्हे तर दिवसाची लाईट पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक महिन्यांपासून करीत आहे. मात्र, सरकार याची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप देखील तुपकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळं रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमधील अरबी समुद्रात जल आंदोलन करणार आहे.

पोलिसांकडून जलसमाधीवरून रविकांत तुपकर यांना नोटीस

जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना घेऊन तुपकर हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, आंदोलनापूर्वी तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'आपण दिलेल्या सामुहिक जलसमाधी इशाऱ्यामुळे कोणताही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा होवून ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होईल'. तसेच शासनाच्या वरील नमूद परिपत्रकातील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील व आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी तुपकर यांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावल्यानंतरही ते मुंबईत जलसमाधी आंदोलन करणार का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT