Sakshi Sunil Jadhav
मीठाशिवाय जेवणाची चव चांगली लागत नाही. मीठ हे सगळ्यांच पदार्थांची चव वाढवतं. पण मीठाचा वापर करण्याच्या काही ट्रिक्स असतात.
काही पदार्थांमध्ये मीठ वरुन टाकून खाणं शरीरासाठी खूप धोक्याचं ठरू शकतं. असा आहारतज्ज्ञ आपल्याला नेहमीच सल्ला देतात.
दह्यात आधीच मीठ किंवा आंबटपणा असतो. वरून मीठ घातल्याने आम्लता वाढते आणि पचन बिघडतं.
सफरचंद, केळी, पपई, डाळिंब अशा फळांवर मीठ टाकल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते आणि पोटदुखी वाढू शकते.
सूपमध्ये मीठ आधीच घातलेलं असते. वरून मीठ घातल्याने सोडियमचं प्रमाण वाढतं.
काकडी, टोमॅटो, गाजरावर मीठ घातल्याने भाज्यांमधील पाणी निघून जाते आणि पौष्टिकता कमी होते.
चिप्स, नमकीन, इन्स्टंट नूडल्स यामध्ये आधीच जास्त मीठ असते. वरून मीठ घालणे आरोग्यास हानिकारक ठरते.
काही लोक उसाच्या रसात किंवा मोसंबीच्या रसात मीठ टाकून पितात. याने त्यातले पोष्टीक घटक कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.