Sakshi Sunil Jadhav
सकाळी घाईगडबडीत मुलांसाठी किंवा स्वत: साठी कांदे पोहे, उपमा किंवा नाश्ता बनवायला वेळ लागतो. अशा वेळेस तुम्ही झटपट हा चाट तयार करू शकता.
चाट खायला आवडत असेल तर ही बटाटा चाट रेसिपी नक्की करून पाहा. करायला अतिशय सोपी असून चव जबरदस्त लागते.
फक्त 5 ते 10 मिनिटांत ही चाट तयार होते. अचानक पाहुणे आले तरी झटपट करता येणारी रेसिपी आहे.
उकडलेले बटाटे, खजूर चटणी, हिरवी मिरची चटणी, दही, शेंगदाणे, बटाटा चिप्स अशी घरात सहज मिळणारी सामग्री लागते.
उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी करून त्या शेंगदाणा तेलात लालसर परतून घेतल्या जातात, ज्यामुळे चाटला खास कुरकुरीतपणा येतो.
जीरं-सुंठ पावडर, मीठ, हिरवी मिरची आणि शेंगदाणा कुट यामुळे चाटला तिखट-आंबट-गोड अशी परफेक्ट चव मिळते.
एका प्लेटमध्ये आधी बटाटा चिप्स, मग बटाट्याची भाजी, त्यावर खजूर चटणी, हिरवी चटणी आणि गोड दही घाला.
क्रश केलेल्या चिप्स, भाजलेले शेंगदाणे, लिंबूरस आणि लाल तिखट भुरभुरल्याने चाट अधिक चविष्ट लागते.
चहा सोबत खाण्यासाठी किंवा लहान मुलांच्या स्नॅकसाठी बटाटा चाट हा उत्तम पर्याय ठरतो.