एकच प्याला, पण तोही धोकादायक! मद्य प्राशन केल्यास गंभीर आजाराचा धोका, 31st पार्टीआधी डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Alcohol acute necrotising pancreatitis risk: ३१ डिसेंबरच्या पार्टीत अनेकजण दारूचं सेवन करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, दारूचे अति सेवन हे Acute Necrotising Pancreatitis या गंभीर आजाराचा धोका वाढवतं.
Alcohol stay in body
Alcohol stay in bodySAAM TV
Published On

आता थोड्या दिवसात नवीन वर्ष सुरु होणार आहे. यासाठी अनेकांनी ३१ डिसेंबरच्या पार्टीचीही तयारी सुरु केली असेल. पार्टी म्हटलं की दारूचं सेवन येतंच. दारूमुळे किडनी आणि लिव्हरवर परिणाम होतो हे सर्वांना माहितीये. परंतु तुम्हाला माहितीये का अगदी खूप वर्षांनंतर दारू प्यायल्यामुळे तुमचं स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज खराब होतं.

जास्त प्रमाणात दारूचं सेवन केल्याने Acute Necrotising Pancreatitis होण्याचा धोका असतो. ही स्वादुपिंडाच्या समस्येची गंभीर अवस्था असते. यामुळे अधिक गुंतागुंत होण्याचा धोका असतो. अनेकांसाठी अशी अवस्था अनपेक्षित असते.

Alcohol stay in body
Heart blockages warning signs: हार्ट ब्लॉकेज आहेत, आधीच मिळतात हे ५ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका

ज्या व्यक्ती दीर्घकाळापासू दारूचं सेवन करतात त्यांना स्वादुपिंडाचा दाह म्हणजेच Alcohol-related Pancreatitis समस्येचा धोका अधिक असतो. तसंच ज्यांना दीर्घकाळापासून Alcohol Use Disorder असतो त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु आता बऱ्याच वर्षांपासून दारू न पिणाऱ्यांमध्येही Acute Pancreatitis ची समस्आ आढळून येतं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

High-Intensity Drinking म्हणजे काय?

युएस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अल्कोहोल अब्युस आणि अल्कोहोलिसच्या मते, High-Intensity Drinking म्हणजे एकाच वेळी भरपूर प्रमाणात दारूचं सेवन करणं. यामध्ये पुरुष एकाच वेळी १० किंवा अधिक पेग तर स्त्रिया ८ किंवा अधिक पेग पितात.

स्वादुपिंडावर दारूचा कसा होतो परिणाम?

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार रेडिओलॉजिस्ट, डॉ शरद माहेश्वरी यांनी सांगितलं की, जास्त दारू प्यायल्याने यकृतावर परिणाम होतो याची आपल्याला माहिती आहे. मात्र याचा परिणाम स्वादुपिंडावरही होतो. जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने स्वादुपिंडातील स्त्राव बदलतात आणि याचा परिणाम थेट पेशींवर होतो. काही लोकांमध्ये यामुळे स्वादुपिंडातील पाचक एन्झाइम्स अकाली एक्टिव्ह होतात. ज्यामुळे इन्फ्लामेशन, पेशींचं नुकसान आणि गंभीर अवस्थेत Necrosis होऊ शकतं.

Alcohol stay in body
Silent heart attack signs: सायलेंट हार्ट अटॅक... कधीही समजून येत नाहीत असे ७ संकेत, वाचा सविस्तर

कोणत्या घटकांमुळे धोका वाढतो?

  • शरीरातील पाण्याची कमतरता

  • कमी वेळेत जास्त प्रमाणात दारूचं सेवन

  • धूम्रपान

  • शरीराला पोषण कमी मिळणं

  • एनर्जी ड्रिंक्ससोबत दारू पिणं

Alcohol stay in body
Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

या परिस्थितीचं निदान कसं केलं जातं?

CT किंवा MRI सारख्या इमेजिंग तपासण्या निदान आणि समस्येची तीव्रता किती आहे याची माहिती देतात. गंभीर प्रकरणांमध्ये आयसीयूमध्ये उपचार आणि दीर्घकालीन रुग्णालयात राहण्याची वेळही रूग्णावर येऊ शकते.

Alcohol stay in body
Blood Cancer: शरीरावर वारंवार दिसतात ही 2 लक्षणं, असू शकतो जीवघेणा ब्लड कॅन्सर, आताच व्हा सावध, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com