

आपल्या शरीरावर अनेकदा काळे-नीळे डाग दिसून येतात. या डागांकडे आपण सामान्य समस्या म्हणून पाहणं सोडून देतो. आपणच कुठेतरी धडपडलो असू किंवा आपटलो असू असा विचार करून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. याशिवाय पाठीचं दुखणं आपण थकवा किंवा चुकीच्या पद्धतीचं बसणं यावर ढकलून मोकळे होते.
मात्र जर ही लक्षणं तुम्हाला वारंवार दिसत असतील तर सावध व्हा. कारण ही लक्षणं एका गंभीर आजाराचे संकेत असतात. अनेकदा यांचा संबंध ब्लड कॅन्सरशी असू शकतो.
आपल्याला एखादी दुखापत तेव्हाच होते ज्यावेळी त्वचेखालील लहान रक्तवाहिन्या फुटतात. दरम्यान जर जखमा कोणत्याही दुखापतीशिवाय दिसल्या तर ते प्लेटलेट संख्या कमी असल्याचं लक्षण असू शकतं.
प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत करतात. जेव्हा बोन मॅरो पुरेशा प्रमाणात प्लेटलेट्स तयार करत नाही, तेव्हा अगदी किरकोळ दुखापतींमुळे देखील त्वचेखाली रक्तस्त्राव होऊ शकतो, ज्यामुळे हे डाग दिसू शकतात.
खांदे, पाठ किंवा कंबरेमध्ये सौम्य सतत वेदना होणं. रात्री किंवा झोपताना वेदना वाढतात.
वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतरही आराम न मिळणं.
रात्री घाम येणं. या घामामुळे कपडे आणि अंथरूण देखील ओलं होऊ शकतं.
विश्रांती घेतल्यानंतरही न जाणारा तीव्र थकवा येणं.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे वारंवार संसर्ग होणं.
कोणत्याही कारणाशिवाय वारंवार ताप येणं.
डाएटिंग किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होणं.
अशक्तपणामुळे चेहरा फिका पडणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं.
ही सर्व लक्षणं थकवा, ताणतणाव किंवा अशक्तपणा यांच्या सारख्या सामान्य समस्यांप्रमाणे वाटू शकतात. मात्र जर ती वारंवार किंवा एकत्रितपणे दिसून आली तर डॉक्टरांना भेटणं महत्वाचं आहे. लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरही नियंत्रण मिळवता येतं.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.