Ajit Pawar : गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रात सुट्टी का? अजित पवार शिंदे सरकारवर संतापले

गुजरात निवडणुकीत महाराष्ट्रातील गुजराती बांधवांना मतदान करता यावं यासाठी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली. आहे.
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV
Published On

Ajit Pawar News : गुजरात निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. अशातच, या निवडणुकीत महाराष्ट्रातील गुजराती बांधवांना मतदान करता यावं यासाठी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde)  सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली. दरम्यान, या निर्णयावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

Ajit Pawar Eknath Shinde
Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही; फडणवीसांचं बोम्मईंना सणसणीत उत्तर

'आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोव्यात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणे चुकीचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी शेतकरी नुकसानभरपाई, मंत्रीमंडळातील नेत्यांचे आक्षेपार्ह विधान, तसेच इतर विविध विषयांवरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. याशिवाय गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या सुट्टीवरही भाष्य केलं.

Ajit Pawar Eknath Shinde
Maharashtra Politics : 'शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होतेय'

काय म्हणाले अजित पवार?

'शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सुट्टी देणं योग्य नाही. निवडणुका या दर पाच वर्षांनी येतात. यापूर्वी असं कधी घडल्याचे मला आठवत नाही. आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशी प्रकारे नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांत मतदारांसाठी भर पगारी सुट्टी जाहीर केली. राज्य सरकारने १ व ५ डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com