Maharashtra Politics : 'शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होतेय'

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं विधान केलं आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis saam tv
Published On

Sanjay Raut News : राज्यातील शिंदे-भाजप सरकार (Eknath Shinde)  लवकरच कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होत आहे. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असल्यामुळे कदाचित या हालचाली त्यांच्यापर्यंत गेल्या असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Disha Salian : दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? CBI अहवालातून धक्कादायक माहिती समोर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्यात पुढील दोन महिन्यांत काय होईल? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी 'आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या कामाला लागलो आहोत', असं सांगितलं आहे. राऊत यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

'रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे, दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही. याचा अर्थ त्यांना आमच्या हालचालीची बित्तंबबातमी कळलेली दिसते. भूगर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत, केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या कानापर्यंत काही गोष्टी गेल्या असतील', असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Sangali News : सांगलीवर संकट! जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा; CM शिंदेंची भूमिका काय?

संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही भाष्य केलं. सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायचीत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले.

जर लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही, तर या राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंची ताबडतोब माफी मागावी, इतक्या तरुण नेत्यावर आरोप करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? असा संतप्त सवालही त्यांनी भाजप नेत्यांना केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com